वैजापूर, (प्रतिनिधी) : शेतात काम करताना सापाने दंश केल्याने गंभीर जखमी झालेल्या येथील महिलेचा घाटी रुग्णालयात शनिवारी २४) दुपारी (ता. पावणेदोनला मृत्यू झाला. उपचारादरम्यान हिराबाई दिगंबर जाधव (वय ५९ असे त्यांचे नाव आहे. त्या गुरुवारी (ता. २२) सकाळी दहाला गावातील शेतात काम करत असताना त्यांना सापाने दंश केला होता.
प्रकृती खालावल्याने नातेवाइकांनी त्यांना तातडीने घाटी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल केले. मात्र, दोन दिवसांच्या शर्थीच्या उपचारांनंतर शनिवारी त्यांचे निधन झाले. याप्रकरणी शिऊर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.












